
पूजा हेगडे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच आपले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करून चात्यांच्या संपर्कात राहते.

दाक्षिणात्य सिनेसृष्टीत सक्रिय असलेल्या पूजा हेगडेने नुकतेच सोशल मीडियावर आपल्या मालदीवच्या सुट्टीचे फोटोज चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. तिचे हे फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत. अभिनेत्रीने मालदीवच्या किनाऱ्यावरील बिकीतील फोटो तिच्या चात्यांच्या पसंतीस उतरले असून हे फोटो आता व्हायरल होत आहे.

ऑफ व्हाईट प्रिंटेड बिकनी आणि नेट श्रग घालून पूजाने साईड पोज देत बोल्ड फोटो शेअर केले आहेत. तिचा हा फोटो पाहून चाहत्यांनी भरपूर कौतुक केले आहे.

अभिनेत्रींच्या या फोटोवर कमेंट्स करत काही चाहते म्हणाले आहेत की,” हे फोटो टिपणारा फोटोग्राफर खर्च नशीबवान आहे,” तर एक नेटकाऱ्याने हे फोटो पाहून म्हणाला की, हिवाळा ऋतूत उन्हाळा असल्याचे जाणवत आहे.

एका चाहत्याने लिहीलेय ‘ही एवढी का क्युट आहे’, तर दुसऱ्याने लिहीले ‘तुझे हास्य खुप गोड आहे’. काहींनी तिला गॉर्जिअल तर काहींनी तिला हॉट अशा कॉम्प्लीमेंट्स दिल्या.

पूजा हेगडेने तीन दिवसाआधीही काही फोटो शेअर केले होते. पाण्यामध्ये विलाज आणि लाकडी पुलावर उभ्या असलेल्या पूजाचे जबरदस्त फोटो आहेत. तिने बिकनी टॉप आणि मॅचिंग शॉर्ट्स घातलेले फोटो शेअर केले.



























































