यंदाचा हंगाम खेळून टेनिस कोर्टला अलविदा करणार! हिंदुस्थानी टेनिस तारका सानियाने केली घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

2022 हा माझा टेनिस कारकीर्दीतील शेवटचा हंगाम असेल हे मी ठरवले आहे. मला हा पूर्ण हंगाम खेळायचा आहे. पण तोवर मी टिकेन की नाही माहीत नाही, अशा शब्दांत हिंदुस्थानी टेनिस तारका सानिया मिर्झा हिने आपल्या निवृत्तीची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियन ओपनच्या महिला दुहेरीत पराभूत झाल्यावर सानियाने आपल्या निवृत्तीचे संकेत आज दिले.

आता वाढत्या वयानुसार शरीर साथ देत नाहीय

“माझ्या निवृत्तीच्या घोषणेची बरीच कारणे आहेत. चला आता मी खेळणार नाही’ हे सांगणे इतके सोपे नाही. मला असे वाटते की माझ्या पुनरागमनाला जास्त वेळ लागतो आहे. मला वाटते, माझा मुलगा तीन वर्षांचा आहे. मी त्याच्याबरोबर मोठा प्रवास करून त्याची कारकीर्दही धोक्यात आणत आहे, हे मला लक्षात घेतले पाहिजे. माझे शरीर साथ देत नाहीये. आज माझा गुडघा खरोखरच दुखत होता आणि त्यामुळेच आम्ही हरलो असे मी म्हणत नाही. पण मला वाटते की जसजसे माझे वय वाढत आहे तसतसे बरे होण्यास वेळ लागतो आहे,’’ अशी खंत सानियाने आपल्या निवृत्तीच्या घोषणेवेळी व्यक्त केली आहे.