राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. पवार यांनी ट्वीट करून आपल्या प्रकृतीविषयीची माहिती दिली आहे. मी कोरोना पॉझिटिव्ह आलो आहे. मात्र, काळजीचं काहीही कारण नाही. माझ्यावर डॉक्टरांनी उपचार सुरू केले आहेत. मी माझ्या संपर्कात आलेल्यांना आवाहन करतो की त्यांनी तपासणी करून योग्य ती काळजी घ्यावी, असं ट्वीट पवार यांनी केलं आहे.