एसटी बस स्थानकांचे आधुनिकीकरण होणार, अॅड. अनिल परब यांचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाकाळामुळे थांबलेले एसटी स्थानकांचे अत्याधुनिकीकरण आता पुन्हा वेग पकडत आहे. अशी बांधकामे लवकरात लवकर पूर्ण करावी असे आदेशच परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी मंगळवारी एका बैठकीत महामंडळाच्या अधिकाऱयांना दिले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamanaonline)

कोरोनामुळे खोळंबलेल्या एसटी स्थानकांतील बांधकामांना पुन्हा गती देण्यासाठी परिवहन मंत्री परब यांनी एसटी अधिकाऱयांची बैठक घेतली होती. यावेळी एसटी स्थानकांतील बांधकामांच्या विकास कामांचा आढावा घेतला. कोरोनामुळे बांधकामे थांबली असली तरी आता त्या कामांना पुन्हा गती देऊन बांधकामे पूर्ण करा असे त्यांनी सांगितले. स्थानकातील रस्तेही चांगल्या दर्जाचे बनवा, स्थानकांत प्रवाशांना उपयोगी पडणाऱया चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्या, असे सांगतानाच या अपूर्ण बांधकामासाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे परब म्हणाले. या बैठकीला एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, एसटी महामंडळाच्या विलीनीकरण संदर्भात उच्च स्तरीय समितीचा अहवाल दोन दिवसात सादर केला जाणार आहे.