‘सुपर थँक्स चिन्ना थाला‘; चेन्नई सुपर किंग्सने दिला रैनाला निरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयपीएलच्या दिग्गज खेळाडूंपैकी एक असलेल्या सुरेश रैनाला लिलावादरम्यान एकही खरेदीदार मिळाला नाही. लिलावात तो विकला न गेल्याने चेन्नई सुपर किंग्सने (csk) त्याच्यासाठी एक पोस्ट शेअर केली आहे. आयपीएल लिलावात सुरेश रैनाची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती, मात्र कोणत्याही फ्रेंचायझीने त्याला खरेदी करण्यात रस दाखवला नाही. त्याचा जुना संघ चेन्नई सुपर किंग्जनेही त्याच्यासाठी बोली लावली नाही, मात्र ज्या रैनाने चेन्नईला अनेकदा आपल्या खेळाणे तारले त्याला निरोप देण्यासाठी चेन्नई सुपर किंग्स संघाच्या व्यवस्थापनाने ‘सुपर थँक्स चिन्ना थाला’ असे ट्विट केले. रैनाच्या चाहत्यांनी मात्र उपकार विसरून आता आभार मानण्याची नाटके बंद करा, असे चेन्नई संघाला ट्विट करून आपला संताप व्यक्त केला आहे.

आता चेन्नई सुपर किंग्सने ट्विटरवर रैनाचे इतक्या वर्षांच्या सेवेबद्दल आभार मानले. “पिवळ्या जर्सीतील अनेक आठवणींसाठी सुपर थँक्स चिन्ना थाला’’, असे चेन्नईने म्हटले आहे.