
मतिमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्या तरुणाला जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. एल. जोशी यांनी 12 वर्षे सश्रम कारावास व दंड ठोठावला आहे. नरेश जनार्दन कोंडा असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे.
नरेश कोंडा याने मतिमंद मुलीवर सार्वजनिक शौचालयात नेऊन अत्याचार केले होते. याप्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली होती. या खटल्यात त 13 साक्षीदार तपासण्यात आले. पीडित मुलगी व वैद्यकीय अहवाल महत्त्वपूर्ण ठरले. न्यायालयाने आरोपी नरेश कोंडा याला 12 वर्षे सश्रम कारावास व साडेपाच हजार रुपये दंड ठोठावला आहे. सरकार पक्षातर्फे ऍड. प्रदीपसिंह रजपूत, तर आरोपीच्या वतीने ऍड. सुखसे व ऍड. जगताप यांनी काम पाहिले.


























































