दृश्यम 2 येतोय!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मल्याळम भाषेतील सुपरहिट चित्रपट ‘दृश्यम 2’च्या हिंदी रिमेकला नुकतीच सुरुवात झाली आहे. अभिनेता अजय देवगण याने सोशल मीडियावर ‘दृश्यम 2’च्या सेटवरील फोटो पोस्ट केले आहेत. ‘विजय त्याच्या कुटुंबीयांना वाचवू शकेल का? दृश्यम 2 ला सुरुवात’ असे कॅप्शन त्याने दिले आहे.

या फोटोत दिग्दर्शक अभिषेक पाठक, अजय देवगण आणि अभिनेत्री श्रिया सरन झळकत आहेत. त्यांच्यासह तब्बू यात मुख्य भूमिकेत आहे. ‘दृश्यम’च्या पहिल्या भागातदेखील हे त्रिकुट झळकले होते. हिंदी भाषेतील ‘दृश्यम’चा पहिला भाग सात वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. निशिकांत कामत याने त्याचे दिग्दर्शन केले होते. ‘दृश्यम 2’ चे चित्रीकरण मुंबई आणि गोव्यात पार पडणार आहे.