लोणी पांढरं आणि बटर पिवळं का दिसतं? वाचा सविस्तर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गरमागरम थालिपीठ आणि त्यावर घरच्या लोण्याचा गोळा किंवा खमंग पावभाजी आणि त्यावर सोडलेला बटरचा तुकडा… वाचून तोंडाला पाणी सुटलं असेल ना? पण, थालिपीठावरचं लोणी आणि पावभाजीवरचं बटर यांची अदलाबदल केली तर? हा विचार तुम्ही निश्चितच केला नसेल.

कारण लोणी आणि बटर हा वास्तविक एकच पदार्थ असला तरी घरी तयार होणारं लोणी हे पांढरं आणि चवीला थोडंस गोडसर-आबंट-तुरट असं असतं. पण बाजारात मिळणारं बटर हे खारट चवीचं असतं. असं का? कोरा या प्रश्नोत्तराच्या संकेतस्थळावर या प्रश्नाचं उत्तर देण्यात आलं आहे.

लोण्याला पिवळा रंग असण्याचे दोन कारणे आहेत. एक नैसर्गिक आणि एक कृत्रिम. नैसर्गिक कारण म्हणजे, सामान्यतः जे लोणी गायीच्या दुधापासून तयार करतात, ते पिवळसर दिसतं. कारण, गायी गवत खातात, ह्या गवतात बीटा केरोटीन नावाच रंगद्रव्य असतं, आपल्याला तर माहितीच आहे प्रत्येक गोष्टीला जो रंग आहे तो एका विशिष्ट रंगद्रव्यामुळे मिळाला आहे. हिरव्या पालेभाजी मध्ये क्लोरॉफील, केशरी रंगाच्या भाज्या फळात कॅरेटिनोइडस इत्यादी रंगद्रव्यांमुळे प्रत्येक फळ-भाजी यांना विशिष्ट रंग प्राप्त होतो.

गायीच्या दूध तयार होण्याच्या पद्धतीत हे बीटा केरोटीन रंगद्रव्य साठवून ठेवण्याची क्षमता असते, जी म्हैस किंवा शेळीमध्ये नसते. त्यामुळे गायीचं लोणी-तूप हे पिवळं आणि इतर प्राण्यांच्या दुधापासून बनवलेलं बटर हे पांढरं असतं. गाय वगळता इतर प्राण्यांच्या बाबतीत त्यांनी खाल्लेल्या गवतात जरी बीटा केरोटीन हे रंगद्रव्य असलं तरी त्याचं रूपांतर अ जीवनसत्वात होतं. अ जीवनसत्व रंगहीन असतं तसंच हे रंगद्रव्य फॅट्स मध्ये रुपांतरित होतं.

गायीच्या दुधामध्ये स्निग्धतेचं प्रमाण 3–6%, नुसत्या सायीमध्ये हे 30–40% आणि त्याचं लोणी बनवलं की 80% इतकं होतं. तर हे जे फॅट्सचे कण असतात त्याला एक आवरण असतं (membrane) ह्या पडद्यामुळे फॅट्स दुधात असले तरी 3 किंवा 6% असल्यामुळे नुसत्या डोळ्यांना दूध पांढरं दिसतं. पण, जसे आपण विरजण लावतो, आणि लोणी बनविण्यासाठी त्या दह्याचं ताक घुसळतो तेव्हा तो पडदा भंगतो आणि रंगद्रव्य फॅट्सच्या कणात पडून लोणी वेगळं होऊन पिवळसर दिसू लागतं.

कृत्रिम पद्धत –

Achiote या वनस्पतीच्या बियांपासून Annato हा कलर व्यावसायिक पद्धतीने डेअरी उत्पादनात लोणी बनवताना वापरला जातो. Annato मध्ये केरेटिनोइड्स हेच रंगद्रव्य असत. हे लोणी किंवा बटर टिकावं म्हणून त्यात Diacetyl नावाचा रासायनिक पदार्थ आणि नैसर्गिक परिरक्षक (preservative) म्हणून मीठ घातलेलं असतं. त्यामुळे बाजारातील लोण्याची चव देखील बदलते.