व्हिजन 2035 मुळे पर्यटनाला चालना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील पर्यटन उद्योगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व राष्ट्रीय संघटनांच्या पॉलिसी फेथ फेडरेशन या संस्थेने देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या रजत वर्षाच्या निमित्ताने पर्यटन क्षेत्राची, उद्दिष्टे आणि लक्ष्याची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने एक व्हिजन स्टेटमेंट जाहीर केले आहे. फेथचे अध्यक्ष नकुल आनंद यांनी देशातल्या पर्यटन क्षेत्रातील उद्योजक आणि कर्मचाऱ्यांसाठी आर्थिक आणि संपत्ती निर्माण करण्याबरोबरच पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या संधी तसेच शाश्वत आणि सर्वसमावेशक वाढीसाठी पर्यटन हे एक आदर्श क्षेत्र बनण्याच्या दृष्टीकोनातून पर्यटनाला जागतिक आणि स्थानिक पातळीवरील प्राधान्याचे आणि पसंतीचे ठिकाण निर्माण करण्याच्या दृष्टीने या व्हिजन 2035 ची ठळक वैशिष्टय़े सादर केली आहेत.