चंद्रपूरात राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा निषेध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छत्रपती शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये करणार्‍या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात चंद्रपूर शहरात महिला संघटनांनी निषेध केला.राज्यपाल पदावरून भगतसिंह कोश्यारींना पायउतार करण्याची मागणी या संघटनांनी केली. डॉ. गावतुरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केले.

छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आक्षेपार्ह विधाने केली होती. त्या विरोधात विविध संघटनांनी निषेध आंदोलन करीत राज्यपालांच्या विरोधात निदर्शने करीत राज्यपालांना तात्काळ पायउतार करा अशी मागणी केली.

”मागील काही दिवसांपासून कोशारी यांच्या विरोधात आंदोलने सुरू आहे. त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नसून तात्काळ त्यांना पदावरून पायउतार करावे अन्यथा महाराष्ट्र बंद करू असा इशारा डॉ. गावतुरे यांनी यावेळी दिला.