पुष्पा पागधरे यांना जीवनगौरव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘इतनी शक्ती हमें देना दाता’ फेम गायिका पुष्पा पागधरे यांना ‘झी मराठी’चा जीवनगौरव मिळाला आहे. पुष्पा पागधरे यांचे वडील भजन गायक होते. पुष्पा यांनी वडिलांकडून संगीताचे शिक्षण घेतले. भजन, ठुमरी, सुगम संगीतात प्रावीण्य मिळवायला सुरुवात केली. प्रसिद्ध संगीतकार वसंत देसाई यांच्याशी भेट झाल्यावर त्यांच्या सांगीतिक कारकीर्दीला कलाटणी मिळाली. राम कदम यांच्या ‘देवा तुझी सोन्याची जेजुरी’ या गाण्यापासून त्यांनी चित्रपट गायनाला सुरुवात केली.

‘सोंगाडय़ा’ या चित्रपटातील ‘राया मला पावसात नेऊ नका!’ हे त्यांचे गाणे गाजले. या गाण्यामुळे त्यांचा आवाज घराघरांत पोचला. ओ. पी. नय्यर, कुलदीप सिंह, सी. रामचंद्र, इक्बाल कुरेशी, आलोक गांगुली अशा अनेक संगीतकारांसोबत त्यांनी काम केले. पुरस्कार सोहळा रविवारी सायंकाळी 7 वाजता ‘झी मराठी’वर बघता येईल.