
इस्लामाबाद Š पाकिस्तानातील सत्तासंघर्ष चांगलाच पेटला आहे. अविश्वास ठरावाच्या हालचालींमुळे इम्रान खान यांची पंतप्रधान पदाची खुर्ची धोक्यात आली असतानाच त्यांनी रविवारी अखेरचा ‘व्हिक्टिम कार्ड’चा डाव खेळण्याचा प्रयत्न केला. त्यांनी इस्लामाबादमधील परेड ग्राऊंडवर जाहीर सभा घेत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.
इम्रान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ या पक्षाने ही सभा आयोजित केली होती. माझ्या मंत्र्यांना आर्थिक आमिष दाखवून खरेदी करण्याचा प्रयत्न आला. मात्र पाकिस्तानातील जनता आजही माझ्यासोबत आहे. विरोधी पक्षांचे कारस्थान यशस्वी होऊ देऊ नका, असे भावनिक आवाहन त्यांनी या सभेतून जनतेला केले. इम्रान यांना लष्करानेही घेरले आहे.





























































