दीड कोटींचा हिशोब दिला नाही, वडिलांनी भररस्त्यात मुलाला पेटवलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एका व्यक्तिने व्यावसायिक वादातून आपल्या मुलाला भररस्त्यात पेटवून दिल्याची घटना बेंगळुरू येथे घडली आहे. या घटनेत मुलगा मृत्युमुखी पडला असून वडिलांना अटक करण्यात आली आहे.

बेंगळुरूच्या चामराजपेट येथे ही घटना घडली आहे. सुरेंद्र (55) आणि त्यांचा मुलगा अर्पित (25) यांच्यात व्यावसायिक कारणामुळे वाद सुरू होता. या दोघांचा कापड व्यवसाय आहे. या व्यवसायातला दीड कोटींच्या व्यवहाराचा वाद दोघांमध्ये उफाळला होता.

या वादावरून शुक्रवारी 1 एप्रिल रोजी चामराजपेटजवळ आझाद नगर येथे ते दोघेही हाच वाद करत उभे होते. अचानक वादाच्या भरात सुरेंद्र यांनी स्वतःच्या मुलावर पेंट थिनर टाकलं आणि काडी टाकून पेटवली. पहिली काडी लागली नाही तेव्हा पुन्हा त्यांनी काडी टाकली.

काडी टाकून आग पेटवल्यामुळे अर्पित गंभीर भाजला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याचा सात एप्रिल रोजी  मृत्यू झाला. पोलिसांनी सुरेंद्र याला पोलिसांनी अटक केली आहे.