
टोमॅटोच्या एका रोपाला एकावेळी साधारण किती टोमॅटो येऊ शकतात दहा, बारा? मात्र ब्रिटनमधील एका शेतकऱ्याच्या एका रोपाला एवढे टोमॅटो आले की त्याचा वर्ल्ड रेकॉर्ड बनला. या शेतकऱ्याने एका रोपाला सर्वाधिक टोमॉटो उगविण्याचा विश्वविक्रम केला आहे.
डग्लस स्मिथ असे या शेतकऱ्याचे नाव असून ब्रिटन येथील हर्टफोर्डशायर येथील तो रहिवासी आहे. आश्चर्य वाटेल मात्र या शेतकऱ्याच्या एका रोपाला तब्बल 1269 टोमॅटो लागले आहेत. जे मोजता मोजता दमछाक झाली. एवढे टोमॅटो एकाच रोपाला लागल्याने शेतकऱ्याचे आणि रोपाचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवले गेले. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड वेबसाइटच्या वृत्तानुसार, डग्लस स्मिथने या अनोख्या पराक्रमाद्वारे विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे.
डग्लस स्मिथने टोमॅटोच्या एका देठामधून सर्वाधिक टोमॅटो पिकवून विश्व विक्रम केला आहे. गेल्या वर्षीपर्यंत हा विक्रम 488 टोमॅटोचा होता. यानंतर डग्लसने हा विक्रम मोडण्याचा विचार करुन विश्वविक्रम केला आहे. त्याने गेल्यावर्षी 839 टोमॅटो एका रोपावर पिकवले होते. मात्र, आता त्याने हा विक्रमही मोडला आणि एका रोपातून 1269 टोमॅटो पिकवून सगळ्यांनाच आश्चर्यचकीत केले.
डग्लसला बागकामामध्ये प्रचंड रस आहे. गेली चार वर्षे तो अर्धाअधिक वेळ बागेत घालवायचा. त्याची ईच्छा होती की त्याला जगातील सर्वोत्कृष्ट माळी व्हावेसे वाटत होते. पण त्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे स्मिथने टोमॅटो रेकॉर्ड करण्यासाठी अनेक विज्ञान विषयक पेपर चाळले होते. याशिवाय मातीचे नमुने गोळा करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. एवढ्या मेहनतीनंतर जेव्हा त्याचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले तेव्हा त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला.



























































