किरीट सोमय्या यांना न्यायालयाचा दणका; अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयएनएस विक्रांत निधी घोटाळाप्रकरणी किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. सोमय्या यांच्या वकिलाने याबाबतची माहिती दिली आहे. न्यायालयात जाईपर्यंत संरक्षण मिळावे, अटक करण्यात येऊ नये, यासाठी किरीट आणि नील सोमय्या यांनी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. न्यायालयाने हा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्याने सोमय्या यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. किरीट सोमय्या सध्या नॉट रिचेबल आहेत.

किरीट सोमय्या यांच्याकडून आपण निर्दोष असल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांमध्ये आणि दिलेल्या पुराव्यानुसार त्यांनी आयएनएस विक्रांतसाठी निधी जमा केल्याचे दिसून येत आहे. तसेच त्यांनी जमा केलेला निधी सरकारकडे वर्ग करण्यात आलेला नाही. तसेच या निधीचे काय झाले याचे पुरावेही नसल्याचे सांगत न्यायालयाने किरीट सोमय्या यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. न्यायालयाच्या या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे सोमय्या यांच्या वकिलाने सांगितले. तसेच नीस सोमय्या यांच्या अटकपू्र्व जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे.