
गुजरातचे अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या मारहाण प्रकरणातील सुनावणी शुक्रवारी आसाममधील बारपेटा न्यायालयात पूर्ण झाली. मात्र, त्यांच्या जामिनावर शुक्रवारी निकाल देण्यात येणार आहे. गुवाहाटी ते कोकराझार दरम्यान मेवानी यांना संरक्षण देणार्या महिला पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेवानी सध्या पोलीस कोठडीत आहेत.



























































