
चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांसाठी रविवारचा दिवस खास राहिला. चेन्नईने सनरायझर्स हैदराबाद संघाचा पराभव केला आणि यंदाच्या हंगामातील तिसऱ्या विजयाची नोंद केली. रविंद्र जाडेजाकडून कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर चेन्नई पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर आली आहे. सामना संपल्यानंतर महेंद्रसिंग धोनी रविंद्र जाडेजाबाबत भरभरून बोलला.
इंडियन प्रीमिअर लीगच्या पंधराव्या हंगामामध्ये पहिल्यांदाच धोनीने चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व केले. धोनी येताच आतापर्यंत सुमार कामगिरी करणाऱ्या फलंदाजांनाही हुरूप आला आणि ऋतुराज गायकवाड व डेवॉन कॉन्वे यांनी तब्बल 182 धावांची सलामी दिली. दोघांनीही अर्धशतकीय खेळी केली. ऋतुराजचे शतक अवघ्या एका धावेने हुकले. चेन्नईने 202 धावांचा डोंगर उभारला आणि गोलंदाजांनी हैदराबादला 189 धावांवर रोखत संघाला विजय मिळवून दिला. या विजयानंतर बोलताना धोनीने आयपीएल 2022 आधी रविंद्र जाडेजाकडे कर्णधारपद सोपवण्याच्या निर्णयावर दिलखुलास वक्तव्य केली.
सामना संपल्यानंतर प्रेझेंटेशन सेरेमनीदरम्यान महेंद्रसिंग धोनी याला कर्णधार म्हणून पुनरागमन केल्याबाबत विचारणा झाली. याला उत्तर देताना धोनी म्हणाला की, फक्त कर्णधार बदलल्याने सर्व गोष्टी सुरळीत होतील असे नाही. तसेच रविंद्र जाडेजा याला पहिल्यांदाच माहिती होते की पुढील वर्षी कर्णधारपद त्याच्याकडे सोपवण्यात येणार आहे आणि तयारी करण्यासाठी त्याच्याकडे भरपूर वेळ होता.
That’s that from Match 46 of #TATAIPL.@ChennaiIPL win by 13 runs against #SRH.
Scorecard – https://t.co/8IteJVPMqJ #SRHvCSK #TATAIPL pic.twitter.com/TuCa1F2mKs
— IndianPremierLeague (@IPL) May 1, 2022
सर्व जाडेजावर सोपवले
तसेच सुरुवातीच्या दोन लढतींमध्ये मी मैदानावर असताना सर्व गोष्टींची दखल घेतली, परंतु त्यानंतर सर्व निर्णय रविंद्र जाडेजावर सोपवले. कारण आयपीएलचा हंगाम संपल्यानंतर असे वाटायला नको की मी फक्त नाणेफेकीसाठी असून मैदानात कर्णधारपद दुसराच कोणीतरी भूषवतोय, असेही धोनी म्हणाला.
IPL 2022 विजयासाठी धडपडणारा कोलकाता आज ‘इन्फॉर्म’ राजस्थानला भिडणार
3D जाडेजा हवाय
महेंद्रसिंग धोनी याने कर्णधारपद स्वीकारल्यानंतर रविंद्र जाडेजा याच्या कामगिरीवर फरक पडल्याचे कबूल केले. जेव्हा तुम्ही कर्णधारपद स्वीकारता तेव्हा अनेक गोष्टी बदलतात आणि याचा प्रभाव तुमच्या कामगिरीवर पडतो. असेच जाडेजासोबतही झाले, परंतु विजयासाठी आम्हाला बॅटर, फिल्डर आणि बॉलर जाडेजा हवाय, असेही धोनी म्हणाला.
पुन्हा धोनी कर्णधार
दरम्यान, आयपीएल 2022 सुरू होण्यापूर्वी दोन दिवस आधी महेंद्रसिंग धोनी याने चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद सोडले आणि यानंतर संघाची धुरा रविंद्र जाडेजा याच्या खांद्यावर देण्यात आली. मात्र जाडेजाच्या नेतृत्वाखाली चेन्नईची कामगिरी खराब राहिली. त्यामुळे जाडेजाने 30 एप्रिल रोजी कर्णधारपद सोडले आणि पुन्हा धोनीकडे नेतृत्व सोपवले.
फलंदाजीत कर्णधार राहुलची धमाल, गोलंदाजीत मोहसीनची कमाल, लखनौची दिल्लीवर 6 धावांनी मात




























































