
एकाचा फोटो आणि दुसऱयाचे आधारकार्ड वापरून सिमकार्डचा झोल करत ते भलत्यांनाच वापरायला दिले जात असल्याचा प्रकार मलबार हिल पोलिसांनी उघडकीस आणला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पिंपरी-चिंचवड येथून दोघांना अटक केली आहे.
मलबार हिल येथे राहणाऱया 59 वर्षीय इस्टेट एजंट मनीष (नाव बदलेले) यांना व्हॉट्सअॅपवर महिलेच्या नावाने मेसेज आला आणि ती पॅरेबियन आयर्लंड येथील असल्याचे म्हणाली. आमची यूकेमध्ये फार्मास्युटिकल पंपनी असून आम्हाला औषध बनविण्यासाठी सोडियम बीफोर केमिकल लागते. ते केमिकल यूकेमध्ये प्रचंड महाग मिळते, तर हिंदुस्थानात ते केमिकल स्वस्तात मिळते. जर तुम्ही सोडियम बीफोर केमिकल मिळवून दिले तर मिळणाऱया नफ्यातील अर्धी रक्कम तुम्हाला देऊ असे त्या महिलेने मनीष यांना सांगितले. काही कंपन्या आहेत असे सांगत रेणुका इंटरप्रायझेस या कंपनीशी संपर्क साधण्यास सांगून तेथील कर्मचाऱयाचा नंबर मनीष यांना देण्यात आला. तुम्ही त्या नंबरवर संपर्क साधून केमिकलचे सॅम्पल घ्या आणि आम्हाला पाठवा असे यूकेमधील त्या महिलेने सांगितले. त्यानुसार मनीष यांनी रेणुका पंपनीला त्या क्रमाकांवर संपर्क साधला असता केमिकलच्या सॅम्पलसाठी 90 हजार भरण्यास सांगण्यात आले. मनीष यांनीदेखील 90 हजार भरले. त्यानंतर मनीष यांच्याशी संपर्क बंद करण्यात आला. आपली फसवणूक झाल्याचे कळताच मनीष यांनी मलबार हिल पोलीस ठाण्यात धाव घेतली.
दोघांच्या मुसक्या आवळल्या
एपीआय तुकाराम डिगे तसेच सुरेश धारवाडकर, बाजीराव संदे, स्नेहल कदम या पथकाने तपास सुरू केला. तांत्रिक तपासात पिंपरी चिंचवड येथे राहणाऱया या दोघांनी सिमकार्डचा झोल करून त्या सिमकार्डच्या माध्यमातून मनीष यांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी राजन शेलार आणि सुरेश म्हेत्रे या दोघांना पकडले. राजन याने सिमकार्ड ऑक्टिव्हेट करून दिल्यानंतर सुरेशने ते विकले होते. एकाचा पह्टो, दुसऱयाचे आधारकार्ड असे करून या दोघांनी बेकायदेशीरपणे सिमकार्ड विकल्याचे समोर आले आहे. असे बोगस कार्ड एका बोगस कॉल सेंटरलादेखील देण्यात आले असून पोलीस त्या कॉल सेंटरचा शोध घेत आहेत.



























































