‘संतूर’च्या दैवी सुरांचा ‘सिलसिला’ लोप पावला…, पंडित शिवकुमार शर्मा कालवश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘संतूर’सारख्या कश्मिरी लोकवाद्याला हिंदुस्थानी शास्त्राrय संगीतात मानाचे स्थान मिळवून देणारे आणि अलौकिक तरंगांनी अवघ्या जगाला मंत्रमुग्ध करणारे पंडित शिवकुमार शर्मा आज कालवश झाले. संतूर आणि शिवकुमार शर्मा हे अद्वैत संपले. पंडितजींच्या सुरांशिवाय अभिजात संगीत अधुरे आहे. आयुष्यभर साधक बनून त्यांनी कलेची सेवा केली. केवळ शास्त्राrय संगीत नव्हे तर प्रख्यात बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया यांच्यासोबत ‘शिव-हरी’ जोडी बनवून हिंदी चित्रपटसृष्टीवर मोहिनी घातली. संतूरच्या दैवी सुरांचा हा ‘सिलसिला’ लोप पावला. पंडितजींच्या पार्थिवावर बुधवारी विलेपार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

पंडित शिवकुमार शर्मा यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मंगळवारी सकाळी 9 च्या सुमारास निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते डायलेसिसवर असले तरी त्यांची प्रकृती उत्तम होती. पुढच्या आठवडय़ात भोपाळ येथे त्यांचा कार्यक्रम होता, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. त्यांच्या पश्चात पत्नी मनोरमा आणि रोहित, राहुल ही दोन मुले आहेत. राहुल शर्मा हेदेखील लोकप्रिय संतूरवादक आहेत. उद्या सकाळी जेव्हीपीडी-जुहू येथे त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवले जाणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.

त्यांची ‘कॉल ऑफ द व्हॅली’ ध्वनिमुद्रिका खूपच लोकप्रिय झाली होती. त्यामध्ये पंडित हरिप्रसाद चौरसिया आणि गिटारवादक ब्रिजभूषण काबरा यांच्याबरोबर त्यांनी वादन केले होते. हरिप्रसाद चौरसिया यांच्याबरोबरची त्यांची जोडी खूप गाजली. ही जोडी ‘शिव-हरी’ या नावाने ओळखली जात असे. या जोडीने अनेक चित्रपटांना संगीत दिले. यश चोप्रांचा ‘सिलसिला’ हा त्यांचा पहिला चित्रपट होता. त्यानंतर या जोडीने ‘फासले’, ‘चांदनी’ , ‘लम्हे’ , ‘डर’ या चित्रपटांना संगीत दिले.

पंडितजींना अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. 1986 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार, 1991 मध्ये ‘पद्मश्री’ तर 2001 मध्ये ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यासोबतच त्यांना 1985 मध्ये बाल्टिमोर या संयुक्त राज्याचे मानद नागरिकत्वही प्रदान करण्यात आले आहे.

‘शिव-हरी’ जोडी गाजली

शिवकुमार शर्मा यांचा जन्म 13 जानेवारी 1938 रोजी जम्मू येथे झाला. वडील उमादत्त शर्मा यांच्याकडून त्यांनी संगीताचे धडे गिरवले. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली वयाच्या तेराव्या वर्षी संतूर हे वाद्य शिकण्यास सुरुवात केली. 1955 मध्ये मुंबईत त्यांनी पहिल्यांदा ते सादर केले. अत्यंत कठीण समजल्या जाणाऱया संतूरवादनात त्यांनी प्रावीण्य मिळवले आणि संतूरला एका वेगळय़ा उंचीवर नेले. त्यांनी या वाद्यावर संशोधन करत त्याला महत्त्व आणि दर्जा मिळवून दिला. त्याला कलात्मक जोड देत जगभरात पोहोचवले.

संगीत हे संगीत असतं…

संगीत हे संगीत असतं. मग ते कोणत्याही स्वरूपातील का असेना.. हे पंडित शिवकुमार शर्मा यांचे तत्त्व. त्यांच्या रागांच्या स्वराविष्काराचा माझ्या आयुष्यावर मोठा परिणाम झाला. त्यांच्या चित्रपट संगीतानेही खूप प्रभावित केले. कित्येक रात्री मी त्यांचा राग झिंझोटी आणि राग किरवाणी ऐकला आहे. राग पहाडीने मला मंत्रमुग्ध केलेय. संतूर सम्राटाच्या निधनाने संगीत क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. – कौशल इनामदार, संगीतकार

मार्गदर्शक हरपला

पंडित शिवकुमार शर्मा म्हणजे संगीत क्षेत्रातील ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व. ते आमचे मागदर्शक होते. एक वेगळा विचार त्यांनी लोकांसमोर मांडला. पंडितजींची प्रामाणिक साधना, कला आणि कलाकारांप्रती असलेले प्रेम हे त्यांचे वेगळेपण आहे. संगीताच्या मूळ परंपरेला धक्का न लावता, त्यांनी नवे प्रयोग केले. संशोधन केले.
– राहुल देशपांडे, गायक

नादमाधुर्याची अलौकिक झंकार

पंडित शिवकुमार शर्मा हे अलौकिक व्यक्तिमत्त्व होते. देवलोकीचे गंधर्व जणू. तसे तेज त्यांच्या चेहऱयावर दिसायचे. आम्ही काही गाण्यांसाठी एकत्र रेकार्ंडग केलेय. खरं तर मी कधी विचारही केला नव्हता की, आयुष्यात मला त्यांचे एवढे प्रेम लाभेल. लहानपणापासून मला वाटायचे की पंडितजी फक्त हरिजींसोबत आहेत. मग दुसऱया कुणा बासरीवादकाला मानतील की नाही… पण मी खूपच भाग्यवान होतो. पंडितजींनी भरभरून प्रेम दिले. सतत प्रोत्साहन दिले. माझ्यावर एक विद्यार्थी पीएच.डी. करत होता. त्याच्या शोधनिबंधात पंडितजींनी माझ्यावर पानभर लिहिले. माझ्यासारख्या कलाकाराला सदैव त्यांचा आशीर्वाद लाभला.

पंडितजींनी संतूर जगात नेलं. शिवकुमार शर्मा यांची खासियत म्हणजे त्यांनी संतूरला शास्त्र्ााrय संगीत वाद्य बनवले. संतूरवर पहिला शास्त्र्ााrय राग वाजवला. अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली. बासरीमध्ये पंडित पन्नालाल घोष यांनी पहिल्यांदा शास्त्र्ााrय संगीत वाजवले, तीच गोष्ट पंडीत शर्मा यांनी संतूरच्या बाबत केली. संतूर वाद्य म्हणजे शततंत्री वीणा, शंभर तारांची वीणा. पंडितजी जेव्हा संतूर वाजवायचे, असं वाटायचे की सारे सितारे एकसाथ झंकारू लागलेत. सारं नादमाधुर्य या वाद्यात सामावायचं. ते स्वतः संगीतातील ध्रुवतारा होते. त्यांना पंडित जसराज ग्रीक देवता म्हणायचे. त्यांच्या जाण्याने संगीत क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे. – पंडित रोणू मुझुमदार, बासरीवादक