धर्मवीर आनंद दिघे हे नाव उच्चारताच डोळ्यासमोर उभा राहतो तो कडवट धर्माभिमान, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील अढळ श्रद्धा आणि सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी अर्पण केलेले सर्वस्व…या धगधगत्या अग्नीकुंडाचा जीवनप्रवास शुक्रवार, 13 मे रोजी मोठय़ा पडद्यावर उलगडणार आहे.या चित्रपटात आनंद दिघेंची भूमिका साकारणाऱ्या अभिनेते प्रसाद ओक यांच्याशी सामना ऑनलाईन टीमने गप्पा मारल्या.