मोदींची विकासकामांवर ड्रोनने नजर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रत्येक राज्यात विकासकामे कुठपर्यंत आली आहेत याचा आढावा घेण्यासाठी ड्रोनद्वारे लक्ष ठेवले जात आहे. मला तिथे प्रत्यक्ष जाऊन पाहणी करण्याची आता गरज राहिलेली नाही. आता मी ड्रोनने सगळय़ांवर लक्ष ठेवतो, माहिती घेतो हे समोरच्याला कळतही नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. दिल्लीत प्रगती मैदानात दोन दिवसांच्या इंडिया ड्रोन फेस्टिव्हल-2022 च्या उद्घाटनावेळी मोदी बोलत होते. केदारनाथ मंदिराच्या पुनर्विकासाचे काम सुरू असताना आपण अशाच प्रकारे ड्रोनमधून आढावा घेतल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. यावेळी मोदींनी प्रत्येक स्टॉलवर भेट देऊन ड्रोन तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेतली. ड्रोनसाठी लागणारे तंत्रज्ञान हे ‘मेक इन इंडिया’ असल्याचा मला अभिमान आहे, असेही मोदी म्हणाले.