ईडी हादरली, हायकोर्टात धावली; नवलानी प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी,

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बिल्डरांकडून खंडणी उकळण्याच्या रॅकेटमधील दलाल जितेंद्र नवलानीविरुद्ध मुंबई पोलिसांच्या एसीबीने कारवाईचा फास आवळताच ईडीची पाचावर धारण बसली आहे. कोटय़वधी रुपयांच्या खंडणी वसुली रॅकेटची पोलखोल होण्याच्या भीतीतून ईडीने नवलानीच्या आडून स्वतःची कातडी वाचवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नवलानीविरोधातील गुह्याचा तपास एसीबीकडून काढून घ्या आणि पेंद्रीय तपास यंत्रणा असलेल्या सीबीआयकडे सोपवा, अशी कळकळीची विनवणी ईडीने याचिकेतून केली आहे.

खंडणी रॅकेटमधील वसुली एजंट जितेंद्र नवलानी व इतर तिघांनी ईडी अधिकाऱयांच्या वतीने मुंबईतील बिल्डर्ससह विविध खासगी पंपन्यांकडून 58 कोटी 96 लाख 46 हजार रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप आहे. याप्रकरणी मुंबई अॅण्टी करप्शन ब्युरोने (एसीबी) नुकताच नवलानीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र नवलानी तपास यंत्रणेला चकवा देत आहे. त्यामुळे एसीबीने त्याच्याविरुद्ध लूकआऊट सर्क्युलर जारी केले आहे. पोलिसांनी अशाप्रकारे कारवाईचा फास आवळताच नवलानीशी लिंक असलेल्या ईडीच्या पायाखालची वाळू सरकली आहे. या पेंद्रीय तपास यंत्रणेने आपल्या ‘खंडणीबहाद्दर’ अधिकाऱयांना वाचवण्यासाठी पायाला चाके लावून न्यायालयात धावाधाव सुरू केली आहे. नवलानीने 2015 ते 2021 या सहा वर्षांत बिल्डर्स तसेच विविध खासगी पंपन्यांकडून खंडणी वसुलीचा सपाटा लावला होता. यामागे ईडीच्या अधिकाऱयांची थेट लिंक असल्याचा आरोप आहे. त्यामुळे तपास यंत्रणा पुरती हादरली आहे.

मुंबई पोलिसांवर अविश्वास, सीबीआयकडून ‘आशा’
ईडीने मुंबई एसीबीवर अविश्वास व्यक्त करीत सीबीआयकडून पारदर्शी तपासाची ‘आशा’ बाळगली आहे. ईडी आणि सीबीआय या दोन्ही पेंद्रीय तपास यंत्रणा आहेत. तसेच नवलानीशी संबंधित खंडणी रॅकेटमध्ये अनेक ईडी अधिकाऱयांचा सहभाग असल्याचा आरोप आहे. अशा परिस्थितीत ईडीने मुंबई एसीबीकडून तपास काढून घेत तो पेंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयकडे सोपवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे खंडणी रॅकेटमध्ये ईडीचे हात खोलवर बरबटले असल्याचा संशय आणखी बळावला आहे.

ईडी अधिकाऱयांवरील कठोर कारवाई रोखा!
एसीबीने खंडणी रॅकेटच्या तपासाला गती दिल्यामुळे ईडी अधिकाऱयांवरही कारवाईची टांगती तलवार आहे. त्या कारवाईपासून आपल्या अधिकाऱयांचा बचाव करण्यासाठी ईडीने उच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे. आर्थिक अफरातफर प्रतिबंधक कायद्यांतर्गत कर्तव्य बजावणाऱया ईडी अधिकाऱयांवर कठोर कारवाई करण्यापासून एसीबीला रोखा, राज्य यंत्रणेला तसे निर्देश द्या, अशी विनवणी ईडीने याचिकेतून केली आहे. या याचिकेवर उच्च न्यायालयात गुरुवारी, 2 जूनला सुनावणी होणार आहे.