ब्रिटनीच्या लग्नात तमाशा, पूर्वाश्रमीच्या पतीला जमिनीवर लोळवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हॉलिवूडची पॉप सिंगर ब्रिटनी स्पिअर्स हिच्या विवाहात भलताच तमाशा झाल्याचं वृत्त आहे. ती तिच्या तिसऱ्या लग्नात व्यग्र असताना तिचा पूर्वाश्रमीचा पती लग्नाच्या ठिकाणी पोहोचला. तेव्हा त्याला सुरक्षारक्षकांनी लोळवलं.

ब्रिटनी स्पिअर्सने सॅम असगारी या तरुणाशी विवाह केला आहे. ब्रिटनीने या सोहळ्याचं आयोजन जिथे केलं होतं. तिथे तिचा पूर्वाश्रमीचा नवरा जेसन अलेक्झांडरही पोहोचला. तिथे त्याने इन्स्टाग्राम लाईव्ह सुरू करून लग्नस्थळात जबरदस्ती घुसायचा प्रयत्न केला. तो बऱ्यापैकी यशस्वीही झाला.

या व्हिडीओतच त्याने सुरक्षारक्षकाला जेसनने ब्रिटनी कुठे आहे, असं विचारलं देखील. त्याखेरीज तो लाईव्हमध्ये, मी सांगतो की या गलिच्छ लग्नात कायकाय होत आहे, असंही तो म्हणाला. अखेर सुरक्षा रक्षकाला धडकल्यानंतर त्याला थांबवण्यात आलं. मग पोलिसांना फोन करण्यात आला. तोवर सुरक्षारक्षकांनी त्याला लोळवलं होतं.

हे ब्रिटनीचं तिसरं लग्न आहे. यापूर्वी ब्रिटनीने अमेरिकन गायक केविन फेडरलिन याच्याशी लग्न केलं होतं. ते लग्न तीन वर्षं टिकलं. या लग्नापासून तिला सीन प्रेस्टन फेडरलिन आणि जेडन जेम्स फेडरलिन असे दोन मुलगे आहेत. 2004मध्ये काही काळासाठी तिने जेसन अॅलेक्झांडरशी लग्न केलं होतं. पण ते लग्न अवघं 55 तासच टिकलं होतं.