मागील 27 वर्षांपासून सेवा देणारे इंटरनेट एक्सप्लोरर हे वेब ब्राऊझर उद्या, 15 जूनपासून बंद होणार आहे. त्याऐवजी आता मायक्रोसॉफ्ट एज येणार आहे. 1995 साली इंटरनेट एक्सप्लोरर हे ब्राऊझर सुरू करण्यात आले होते. एकेकाळी हे इंटरनेट ब्राऊझर लोकप्रिय होते. 2000 सालानंतर त्याच्या युजर्सची संख्या झपाटय़ाने वाढली. 2003 मध्ये त्याचा मार्केट शेअर सुमारे 95 टक्क्यांपर्यंत वाढला होता. पुढे गुगल क्रोम, फायरफॉक्स असे ब्राऊझर बाजारात आले आणि इंटरनेट एक्सप्लोरर मागे पडले.



























































