
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल आज जाहीर झाला. राज्याचा निकाल 96.94 टक्के लागला असून बारावीप्रमाणेच दहवीच्या परिक्षेतही मुलींनीच बाजी मारली. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 99.27 टक्के लागला तर नाशिक विभागाचा निकाल सर्वात कमी लागला म्हणजेच 95. 90 टक्के लागला आहे.
नऊ विभागीय मंडळातून एकूण 15 लाख 84 हजार 790 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील 15 लाख 21 हजार 03 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 6 लाख 50 हजार 779 विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. 5 लाख 70 हजार 27 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. 12210 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. तर 29 शाळांचा निकाल 0 टक्के लागला आहे.
दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 94.40 टक्के
9 विभागीय मंडळातून 8169 दिव्यांग विद्यार्थ्यांनी दहावीसाठी नोंदणी केली होती. यापैकी 7579 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दिव्यांगांचा निकाल 94.40 टक्के लागला आहे.
टक्केवारी व विद्यार्थ्यांची संख्या
90 टक्के व त्याहून अधिक – 83060
85-90 टक्के – 1 लाख 49 हजार 221
80-85 टक्के – 2 लाख 1 हजार 377
75-80 टक्के – 2 लाख 18 हजार 624
70-75 टक्के – 2 लाख 10 हजार 738
शाळांची संख्या व निकालाची टक्केवारी
0 टक्के – 29 शाळा
1-10 टक्के – 1
10-20 टक्के- 5
20-30 टक्के- 4
30-40 टक्के-18
40-50 टक्के-38
50-60 टक्के- 41
60-70 टक्के – 123
70-80 टक्के – 321
80-90 टक्के- 1330
90-99.99 टक्के – 8801
100 टक्के -12210
दहावी व बारावीच्या पुरवणी परिक्षेची घोषणा
यंदा दहावी व बारावीची परिक्षा पास न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परिक्षेची घोषणा करण्यात आली आहे. बारावीची पुरवणी परीक्षा 21 जुलैपासून सुरू होणार असून ती 12 ऑगस्टपर्यंत चालेल. 10 वीची पुरवणी परीक्षा 27 जुलैपासून सुरू होईल 12 ऑगस्टला ती संपेल.
कॉपी करणारे 79 विद्यार्थी सापडले
यावर्षी कॉपीचे प्रकार करणारे 79 विद्यार्थी सापडले आहेत. धमकी, विनंती, ओळखीचे फोन करणे, पेपरचे पान फाडणे असे प्रकार करणारे 32 सापडले आहेत तर एक डमी विद्यार्थी सापडला आहे.
मार्च 2020 साली प्रत्यक्ष परिक्षा झाली होती. त्यावेळी 16 विद्यार्थी डमी सापडले होते. तर 572 विद्यार्थ्यांना कॉपी करताना पकडलेले. एक गैरप्रकार घडला होता. असे एकूण 589 प्रकार घडले
































































