
रत्नागिरीच्या दी यश फाऊंडेशनच्या कॉलेज ऑफ नार्ंसग मेडिकल रिसर्च इन्स्टिटय़ूटने नार्ंसग अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या 17 विद्यार्थिनींची फसवणूक केली आहे. इन्स्टिटय़ूटमध्ये जीएनएम अभ्यासक्रमासाठी 30 विद्यार्थ्यांची क्षमता आहे. तरी 2021 या शैक्षणिक वर्षात 47 विद्यार्थिनींना संस्थेने प्रवेश दिला. त्यामुळे 17 विद्यार्थिनी परीक्षेपासून वंचित राहिल्या आहेत.
विद्यार्थिनींवर झालेल्या या अन्यायाविरोधात वाचा फोडण्यासाठी उद्या 21 जूनपासून विद्यार्थी आणि पालक आझाद मैदानात उपोषणाला बसणार आहेत. या इन्स्टिटय़ूटने या विद्यार्थिनींकडून तब्बल दीड लाख रुपये फी घेतल्याचेदेखील उघड झाले आहे. भारतीय लोकसत्ताक विद्यार्थी संघाने हे प्रकरण उघडकीस आणले आहे.




























































