‘झपूर्झा’साठी मदतीचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवोदित कलाकारांना अभिनय, ध्वनी संयोजन, प्रकाशयोजना, नेपथ्य, व्यवस्थापन आणि लेखन, काव्य शिकण्याची संधी मिळण्यासाठी अजेय संस्थेच्या झपूर्झाने पुढाकार घेतला आहे.  अजेय संस्थेच्या ‘झपूर्झा’चे हे 10 वे तेजस्वी दशक महोत्सवी वर्ष. या दहाव्या वर्षातील एक उत्तुंग कार्य म्हणजे अभिनय आणि काव्य संशोधन केंद्र उभारणी. या पेंद्रात आपल्या सर्व रसिकांना एक भव्यदिव्य दालन जिथे अभिनयविषयक जागतिक व भारतीय संदर्भग्रंथ, चरित्रे, आत्मचरित्र, मराठी काव्य विषय समीक्षा ग्रंथ, संतसाहित्य, रससिद्धांत, काव्यसंग्रह अभ्यासक कवी व कलाकारांसाठी आणि इच्छुक रसिक वाचकांसाठी उत्तम अभ्यासिका अगदी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उपलब्ध होणार आहे. त्यासाठी अनेक मदतींच्या हातांची गरज आहे. पुढील क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गौरव संभूस – 9930175527. अवधूत येरगोळे – 8928864171. या क्रमांकावर गुगल पे करण्याचे आवाहन लेखिका / कवयित्री उमा नंदीप रावते यांनी केले आहे.