
अवैधरित्या गुटख्याची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या तस्कराला खंडणी विरोधी पथक दोनने अटक केली. त्याच्याकडून तब्बल 25 लाख 80 हजारांचा प्रतिबंधित विमल गुटखा जप्त करण्यात आला आहे. त्याच्यावर मुंढवा परिसरात कारवाई करून मोटारीसह गुटखा जप्त केला आहे. प्रकाश प्रेमाराम भाटी (वय 33, रा. कात्रज, कोंढवा रोड) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
प्रतिबंधीत तंबाखुजन्य पदार्थ, गुटख्यासह अमंली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरूद्ध कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिले आहेत. त्यापार्श्वभूमीवर खंडणी विरोधी पथक दोन पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अमलदार अमोल पिलाणे आणि चेतन शिरोळकर यांना गुटखा तस्कराची माहिती मिळाली. तो मुंढवा परिसरात मोटारीतून विमल गुटख्याची विक्री करण्यासाठी येताच पथकाने प्रकाश भाटी याला ताब्यात घेत गुटखा जप्त केला.
ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदिप कर्णिक, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे, एपीआय चांगदेव सजगने, उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, चेतन शिरोळकर, प्रदिप शितोळे, राहुल उत्तरकर, विनोद साळुंखे, अनिल मेंगडे, शैलेश सुर्वे, विजय गुरव, संग्राम शिनगारे, सैदोबा भोजराव, प्रदिप गाडे, सचिन अहिवळे, अमोल पिलाने, किशोर बर्गे, रवी सपकाळ आशा कोळेकर यांनी केली.



























































