
जम्मू कश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात शनिवारी एलओसीजवळ पाकिस्तानी ड्रोन दिसला आहे. त्यानंतर सतर्क होत लष्कराने गोळीबार केला. गोळीबारानंतर हा ड्रोन पाकिस्तानच्या भागात परतला आहे. लष्कराच्या अधिकाऱ्याने याबाबतची माहिती दिली आहे.
लष्कराच्या काही जवानांना शुक्रवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पाकिस्तानी ड्रोन एलओसीजवळ दिसला. सीमेपलीकडून आलेला ड्रोन दिसताच जवानांनी सतर्कता बाळगात ड्रोनवर गोळीबार केला. मात्र, ड्रोनला गोळी लागली नाही. गोळीबाराला सुरूवात करताच तो ड्रोन पाकिस्तानच्या हद्दीत परतला.
पूंछ जिल्ह्यातील मेंढर केजी सेक्टरजवळ अचानक पाकिस्तानी ड्रोन दिसल्याने सुरक्षा दल सतर्क झाले आहे. ड्रोन दिसल्यानंतर लष्कर आणि पोलिसांनी परिसरात शोध मोहीम राबविली आहे. याआधी सीमारेषेजवळ अरनिया सेक्टरजवळ ड्रोन दिसला होता. त्यावेळीही जवानांनी गोळीबार केल्यावर तो ड्रोन परतला होता. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानातून येणाऱ्या ड्रोनच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे सुरक्षा दल सतर्क झाले आहे.




























































