पुणे-बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धा आज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते आणि महाराष्ट्र ऑलीम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी (दि. 23) राष्ट्रीय व राज्य स्तरावर पुणे ते बारामती सायकल स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेचे हे सलग सातवे वर्ष होय. कोरोनामुळे गेली दोन वर्षे स्पर्धा आयोजित करता आली नाही. त्यामुळे ही सायकल शर्यत घेण्यात यावी अशी अनेक खेळाडूंची मागणी होती. म्हणून यावर्षी जुलैमध्ये सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र सायकलिंग असोसिएशन यांच्या सहकार्याने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने पुणे-बारामती सायकल शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे.

विविध गटात होणाऱया या राष्ट्रीय स्तरावरील सायकल स्पर्धेमध्ये देशभरातील चारशेहून अधिकग राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सायकलपटू सहभागी होणार आहेत. राज्य पातळीवरील स्पर्धेमध्ये सर्व वयोगटात मिळून 500 स्पर्धक सहभागी होणार आहेत. कर्नाटक, आंध्रप्रदेश, सेनादल, चंदीगड, दक्षिण-मध्य रेल्वे, उत्तर-पूर्व रेल्वे, एअरपर्ह्स, तामिळनाडू, गुजरात, मध्य रेल्वे, नवीदिल्ली यांच्यासह महाराष्ट्रातील सायकलपटू या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. त्यामध्ये आर्मीतील कृष्णा नायकवडी, साहिल कुमार, मंजीत सिंह, सतबीर, रवी कारंडे, किशोर जाधव, रेल्वेमधील श्रीधर सावनूर, राहूल सिंह, मुकेश, अरविंद पनवर या आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह इतर राज्यातून राष्ट्रीय खेळाडू सहभागी होणार आहेत.