पुणे – इंदापूर येथे प्रशिक्षणार्थी विमान कोसळले, प्रशिक्षणार्थी महिला पायलट जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
airoplane-crash

महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी गावात आज सकाळी 11.30 वाजता प्रशिक्षणार्थी विमान एका शेतात कोसळले. या अपघातात 22 वर्षीय प्रशिक्षणार्थी पायलट भाविका राठोड जखमी झाली. तांत्रिक बिघाडामुळे विमान कोसळल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, इंदापूर तहसीलच्या कडबनवाडी येथे सकाळी 11.30 वाजता हा अपघात झाला. पुण्यातील बारामती विमानतळावरून खासगी एव्हिएशन स्कूलच्या या विमानाने उड्डाण केले. पायलट भावना राठोड यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.