
रत्नागिरी पंचायत समितीच्या गणांची आरक्षण सोडत आज शामराव पेजे सभागृहात पार पडली. वाटद गण अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव झाला तर नागरीकांच्या मागास प्रवर्गासाठी केळये, कर्ला आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलासाठी नाणीज, खेडशी आणि हरचेरी गण आरक्षित झाले आहेत.
तहसिलदार शशिकांत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचायत समिती गणांची सोडत काढण्यात आली. यावेळी नायब तहसिलदार माधवी कांबळे, अव्वल कारकून मंदार दामले, श्रीमती दाभाडे, विलास सरफरे, अमोल कांबळे, प्रियांका महाडीक, गायत्री कुलकर्णी, परिमल डोर्लेकर, कांबळे, बंदरकर, रवी खाके उपस्थित होते. यावेळी बरखा संदे या लहान मुलीच्या हातून आरक्षणाच्या चिठ्ठ्या काढण्यात आल्या.
पंचायत समितीनिहाय गण आरक्षण पुढील प्रमाणे आहे
अनुसूचित जाती महिला – वाटद.
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला – नाणीज, खेडशी, हरचेरी.
नागरिकांचा मागास प्रवर्ग – केळये, कर्ला.
सर्वसाधारण महिला – कोतवडे, भाट्ये, गोळप, गावखडी, वरवडे, खारवीवाडा, पावस, हातखंबा.
सर्वसाधारण – जयगड, खालगाव, ओरी, करबुडे, झाडगाव म्युन्सिपल हददीच्या बाहेर, साखरतर, नाचणे, पडवेवाडी, कुवारबाव.



























































