
पानटपरीच्या जागेतून दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना 3 ऑगस्टला रात्री आठ वाजण्याच्या सुमारास वाघोलीत घडली. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवाजी बाजीराव जाधव, हिरामण बाजीराव जाधव, सतीश दिंगबर जाधव, बाळू दिगंबर जाधव, लक्ष्मण बाजीराव जाधव अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. हिरामण पवार, आकाश पवार अशी जखमींची नावे आहेत. सविता हिरामण पवार (रा. वाघोली ) यांनी तक्रार दिली आहे.
पानटपरीच्या जागेवरून सविता आणि सतीश यांच्यात भांडण सुरू होते. त्यावेळी शिवाजीने हिरामण यांना शिवीगाळ केली. त्याचा जाब विचारल्यामुळे आरोपींनी सविता यांच्या घरापुढे जमाव जमवून हिरामण आणि आकाशला बेदम मारहाण केली. त्याशिवाय आरोपींनी सविता यांच्या आई-वडिलांनाही शिवीगाळ करीत मारहाण केली. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक महादेव लिंगे तपास करीत आहेत.
दुसऱ्या गुन्ह्यात पोलिसांनी गणेश काळे, हिरामण पवार, आकाश पवार, सविता पवार, संतोष काळे, पुजा काळे, मालन काळे, रामदास काळे सर्व (रा. वाघेश्वरनगर, वाघोली) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. शिवाजी बाजीराव जाधव, अनिता जाधव, बापू जाधव, अशी जखमींची नावे आहेत.































































