खारमध्ये हवेत गोळीबार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी हवेत गोळीबार केल्याची घटना आज सायंकाळी खारच्या लिंकिंग रोड परिसरात घडली आहे. गोळीबारात कोणी जखमी झाले नाही. खार पश्चिम येथील लिंकिंग रोड हा परिसर नेहमी गजबलेला असतो. आज सायंकाळी तीन जण मोटारसायकलवरून आले. त्याने हवेत गोळीबार केला. अचानक गोळीबार झाल्याने तेथे फेरीवाले आले. गोळीबार केल्यानंतर ते तिघे मोटारसायकलवरून पळून गेले. या घटनेची माहिती समजताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी आले. घटनास्थळी पोलिसांना एक चिठी आढळून आली आहे. रस्त्यावर फेरीवाल्याने व्यवसाय करू नये अन्यथा गंभीर परिमाण होईल असे त्या चिठीत नमूद होते. नेमक्या कोणत्या वादातून हवेत गोळीबार झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.