शिरीषायन – बाई आम्ही सी.के.पी. गं सी.के.पी.

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> शिरीष कणेकर

जाता जात नाही ती जात. म्हणूनच सी. के. पी. (पक्षी ः ‘चांद्रसेनीय कायस्थ प्रभू’) ही जात नसून तो एक महान त्यागी सर्वभक्षक धर्मसंप्रदाय आहे. अमूक एका सी. के.प्यानं काsंबडी पिंवा मटण पिंवा बांगडय़ाला नकार दिला- तोही खायच्या वारी- तर बोलणाऱयाला खुशाल मांदेलीच्या टबमध्ये बुडवून मारा. अभक्षभक्षणाचा मान राखणाऱया सी. के. पी. महिलेला ‘रविवारी काय केलं होतं?’ हा अवलक्षणी प्रश्न चुकूनही विचारू नका. रविवारी सामिष भोजनाचा कुठलाच प्रकार घरी होत नसेल (पिंवा बाहेरून हॉटेलातून मागवला जात नसेल) तर तमाम सी. के. पी. त्यांना बिनदिक्कत ज्ञातीबाहेर टाकतील.

पराकोटीच्या अभिमानानं मांसमच्छी खाणे हा कायस्थांचा स्थायी भाव आहे. खाण्याइतकेच त्याविषयी आसुसून बोलणे त्यांना आवडते. दुसऱया कोणी (इथे कोणाही अन्य विवक्षित जातीजमातीकडे अंगुली निर्देश करण्याची इच्छा असली तरी हिंमत नाही हे चाणाक्ष, चतुर सहृदयी जात्यांधांनी ओळखलं असेल अशी या सी. के. प्यांची नम्र सामिष भावना आहे. मटण-चिकनविषयी बोलणं आम्हाला आवडत नाही. तो दुसरा कोणी आमच्यापैकीच असला तरी. आपण सगळे उत्तम करत असू, पण त्यातही हमारी बात और है. आपल्यासारखे खिमा-पॅटीस त्रिभुवनात कोणी करत नाही (अपवादः तिची आई व तिची लेक!) असा माझ्या सौभाग्यवतीचा ठाम विश्वास आहे. देव व खिमा-पॅटीस यातल्या कोणावर जास्त विश्वास आहे असं तिला विचारलं तर ती निर्विवादपणे (स्वतःच्या) खिमा-पॅटीसकडे बोट दाखवेल. तो खाताना तिच्या पाकनैपुण्याचे गोडवे गायचे असतात, पण एवढं पुरेसं नाही. आणखी कोणाकोणाचे खिमा-पॅटीस कसे भंगार होते याचे रसभरीत वर्णन करायचे असते. मग ती घरच्यांसाठी म्हणून चार-सहा पॅटीसवर बांधून देते. मी तिला पॅटीस-क्वीन’ म्हणतो.

तशा काही मर्यादा आम्ही कसोशीनं पाळतो. सोमवार, गुरुवार, शनिवार, संकष्टी, एकादशी, अक्षय तृतीया, सणासुदीला बोलण्यातदेखील आम्ही बोकड किंवा मुर्गी येऊ देत नाही. अख्खा श्रावणात अंडही घरात फुटत नाही. अत्यंत नाइलाजानं आम्ही बकरीसारखे झाडाचा पाला ओरबाडतो. नाहीतर मला सांगा, भेंडी, पडवळ, गवार, दुधी, वांगं, गिलपं, नवलकोल या काय खायच्या गोष्टी आहेत? बटाटा त्यातल्या त्यात जवळचा वाटतो. कारण प्रथेनुसार तो मटणातही घालतात. (आमच्यातील काही कडवे मटणाचा व बटाटय़ाचा संपर्क होऊ देत नाहीत. बटाटा बाटवतो असे त्यांचे मत आहे.) वाघ-सिंह कुठे बोकडाबरोबर बटाटा खातात? ते हरीणही न शिजवता, न भाजता, ‘ग्रेव्ही’ न करता नुसतंच खातात. जेवल्यानंतर ते हरणाची शिंगे सुपारी म्हणून खात असतील.

माझे वडील फोनवर स्वतःची ओळख डॉ. काणेकर अशी करून देत. ‘तुम्ही स्वतःला काणेकर का म्हणता?’ मी बुचकळय़ात पडून विचारले.

‘अरे, लोकांना काणेकर नाही, कणेकर असं करेक्ट करून करून मी पंटाळलो. म्हटलं काणेकर तर काणेकर, काय फरक पडतो?’

‘असं कसं?’ मी म्हणालो, ‘काणेकर सारस्वत, कणेकर सी. के. पी.’

‘असं असतं का?’ अण्णा म्हणाले, ‘मग मिस्टर शिरीष, तुम्ही सारस्वत की सी. के. पी.?’ किती भाबडे होतात तुम्ही, अण्णा. मी बेरकी आहे.

कोणीतरी मला खालील उद्बोधक मजकूर पाठवला.

‘गणपती सी. के. पी. आहे. कारण हत्तीचं शिर गणपतीला बसवलंय. हत्ती हा बुद्धिमान प्राणी आहे म्हणून गणपती ही बुद्धीची देवता आहे. हत्तीला सुळे असतात. सुळे सी. के. पी. म्हणून हत्ती सी. के. पी. हत्ती सी. के. पी. म्हणून गणपती सी. के. पी. गणरायाच जर सी. के. पी. तर बाकीच्या लहानसान देवांचं काय घेऊन बसलात?…’
बाजीप्रूभू देशपांडे, राम गणेश गडकरी, सी. डी. देशमुख, सुभाष गुप्ते, नूतन आणि स्वतः जातीनं अस्मादिक सी. के. पी. तसे खंडीभर कर्तृत्ववान, गुणाढय़, नामवंत सी. के. पी. आहेत. पण मुद्दा सिद्ध करण्यासाठी उपरनिर्दिष्ट चार-पाच नावं पुरेशी आहेत.

सी. के. पी. माणसाला सौम्य, मवाळ, पुचाट काहीतरी खाताना पाहिलं की माझ्या मनात येतं की पिंजऱयातल्या पिंवा सर्कशीतल्या वाघ-सिंहांना तरी कोणी न्याहारीला साबुदाण्याची खिचडी, इडली, रताळय़ाचा किस, उपमा देतं का? जे वाघ-सिंहांचं तेच आमचं.

सांगायचा मुद्दा काय तर आता खाववत नाही. (वाघ-सिंहाचे दात पडतात? मग ते मुगाची खिचडी, गव्हाची लापशी, पावाचा मधला मऊ भाग, दूध-चपाती, खिमट-भात खातात का?)
म्हाताऱया सी. के. प्यांनी काय खायचं? म्हणजेच मी काय खायचं? ऐका, दारावरची बेल वाजत्येय. कोणी जेवायला बोलवायला तर आलं नसेल?…

– [email protected]