
हिंदुस्थानच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबईभरात ध्वजारोहणासह विविध, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शिवाय विविध संस्था, संघटनांच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त शिवसेनाप्रणित शिव सामर्थ्य सेनेच्या वतीने शिवसेना सचिव, शिव सामर्थ्य सेनेचे प्रमुख मार्गदर्शक, खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदशनाखाली व शिव सामर्थ्य सेनेचे प्रमुख सल्लागार तुकाराम पाटील यांच्या सल्ल्याने आणि अध्यक्ष संदीप भोज यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या मध्यवर्ती कार्यालयाजवळ एनएसजी कमांडो विक्रम डिगे यांच्या हस्ते सोमवारी ध्वजारोहण झाले. या वेळी शिव सामर्थ्य सेनेचे कोषाध्यक्ष मनोज घोडेस्वार, प्रवत्ते नितीन ढेरंगे, ठाणे जिल्हाध्यक्षा अमृता पवार, मुंबई कार्याध्यक्ष जुबेर सोलंकी, अंधेरी विधानसभा अध्यक्ष जस्टीन पंडोल, ठाणे तालुका अध्यक्षा रेखा पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
हिंदुस्थानच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त सोमवारी कन्नमवार येथे आमदार सुनील राऊत यांच्या हस्ते तिरंगा फडकवण्यात आला. या वेळी दत्ता दळवी, शेखर जाधव, उपेन्द्र सावंत, आनंद पाताडे आदी मान्यवरांसह रहिवाशी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.


























































