दमदार! Audi q3 हिंदुस्थानमध्ये लॉन्च, फक्त 7.3 सेकंदात गाठते 0 ते 100 किलोमीटर प्रतितासाचा वेग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑडी या जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनीने आज नवीन ‘ऑडी क्यू3’ ही दमदार कार हिंदुस्थानमध्ये लॉन्च केली. प्रिमिअम प्लस व टेक्नोलॉजी या दोन व्हेरिएण्ट्समध्ये ही कार लॉन्च करण्यात आली आहे. ही गाडी फक्त 7.3 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर प्रतितासाचा वेग गाठते असा दावा कंपनीने केला आहे.

नवीन ऑडी क्यू3 मध्ये 2.0 लिटर टीएफएसआय इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 190 एचपी शक्ती व 320 एनएम टॉर्कची निर्मिती करते. ही गाडी पल्स ऑरेंज, ग्लेशियर व्हाइट, क्रोनोस ग्रे, मिथोस ब्लॅक आणि नवारा ब्ल्यू या पाच आकर्षक रंगात उपलब्ध आहे.या गाडीच्या डिलिव्हरीला या वर्षाच्या अखेरपर्यंत सुरूवात होईल.

प्रिमिअम प्लस आणि टेक्नोलॉजी या दोन व्हेरिएण्ट्समध्ये ही कार उपलब्ध आहे. प्रिमिअम प्लस व्हेरिएण्टची किंमत 44 लाख 89 हजार रूपये आणि टेक्नोलॉजी व्हेरिएण्टची किंमत 50 लाख 39 हजार रूपये आहे.

नवीन ऑडी क्यू३ तिच्या पूर्वीच्या मॉडेलपेक्षा अधिक स्‍पोर्टियर दिसते. पहिल्या 500 ग्राहकांसाठी 5 वर्षांची एक्स्टेण्डेड वॉरंटी आणि 3 वर्ष / 50000 किमी कॉम्प्रेहेन्सिव्ह सर्विस व्हॅल्यू पॅकेज देण्यात येणार आहे. विद्यमान ऑडी इंडिया ग्राहकांना देखील लॉयल्टीचा लाभ मिळतील.

ऑडी क्यू३ प्रिमिअम प्लसची वैशिष्ट्ये:

  • 45.72सेमी (आर 18) 5-आर्म स्टाइल अलॉई व्हील्स
  • क्वॉट्रो ऑल-व्हील ड्राइव्ह
  • एलईडी हेडलॅम्प्ससह एलईडी रिअर कॉम्बीनेशन लॅम्प्स
  • पॅनोरॅमिक ग्लास सनरूफ
  • उच्च ग्लॉस स्टायलिंग पॅकेज
  • पॉवर अॅडजस्टेबल फ्रण्ट सीट्ससह फोर-वे लम्बर सपोर्ट
  • लेदर/लेदरेट कॉम्बीनेशनमध्ये सीट अपहोल्स्टरी
  • रिअर सीट प्लससह फोअर/अॅफ्ट अॅडजस्टमेंट
  • लेदरमध्ये रॅप केलेले 3-स्पोक मल्टीफंक्शन प्लस स्टिअरिंग व्हीलसह पॅडल शिफ्टर्स
  • सिल्व्हर अॅल्युमिनिअम डायमेन्शनमध्ये डेकोरेटिव्ह इन्सर्ट्स
  • अॅम्बियण्ट लायटिंग पॅकेज (सिंगल कलर)
  • पुढील बाजूस स्कफ प्लेट्ससह अॅल्युमिनिअम इन्सर्ट्स
  • स्टोरेज व लगेज कम्पार्टमेंट पॅकेज
  • कम्फर्ट सस्पेंशन
  • हिल स्टार्ट असिस्ट
  • फ्रेमलेस ऑटो-डिमिंग इंटीरिअर रिअर व्ह्यू मिरर
  • 2-झोन क्लायमेट कंट्रोल सिस्टिम
  • पार्किंग एड प्लससह रिअर व्ह्यू कॅमेरा
  • क्रूझ कंट्रोल सिस्टिमसह स्पीड लिमिटर
  • एक्स्टीरिअर मिरर्स, पॉवर अॅडजस्टेबल, हिटेड व पॉवर फोल्डिंग, दोन्‍ही बाजूस ऑटो-डिमिंग
  • डिजिटल इन्स्ट्रूमेंट क्लस्टर
  • ब्ल्यूटूथ इंटरफेस
  • ऑडी स्मार्टफोन इंटरफेस
  • इलेक्ट्रोमेकॅनिकल पॉवर स्टिअरिंग
  • सहा एअरबॅग्ज
  • टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम
  • इसोफिक्स चाइल्ड सीट अँकर्स आणि बाहेरील रिअर सीट्ससाठी टॉप टेथर
  • ऑडी-थेफ्ट व्हील बोल्ट्स
  • स्पेस-सेव्हिंग स्पेअर व्हील

नवीन ऑडी क्यू३ टेक्नोलॉजीची वैशिष्ट्ये –

  • अॅल्युमिनिअल लुकमधील इंटीरिअर (मिरर अॅडजस्टमेंट स्विचवरील एलीमेण्ट्स, पॉवर विंडो स्विचेस, पार्किंग ब्रेक कंट्रोल बटन आणि अॅल्युमिनिअम लुकमधील डोअर स्ट्रिप्स)
  • एमएमआय नेव्हिगेशन प्लससह एमएमआय टच
  • ऑडी ड्राइव्ह सिलेक्ट
  • ऑडी व्हर्च्युअल कॉकपीट प्लस
  • अॅम्बियण्ट लायटिंग पॅकेज प्लस (30 रंग)
  • कम्फर्ट कीसह गेस्चर-नियंत्रित टेलगेट
  • लगेज कम्पार्टमेंट लिड, जे इलेक्ट्रिकली उघडते व बंद होते
  • ऑडी फोन बॉक्ससह वायरलेस चार्जिंग सिस्टिम
  • ऑडी साऊंड सिस्टिम (10 स्पीकर्स, 180 वॅट)