
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचा लग्नानंतरचा पहिलाच गणेशोत्सव. मात्र यावर्षी पहिल्यांदाच सोनालीच्या घरी गणपती बाप्पा येणार नाहीत. नुकतेच सोनालीच्या आजीचे निधन झाले आहे. त्यामुळे यंदा कुलकर्णी कुटुंबाने गणपती बाप्पा न आणण्याचा निर्णय घेतला आहे. सोनालीने फेसबुकवरून एक पोस्ट टाकत गेल्या वर्षीच्या गणपतीचे फोटो शेअर केले आहेत. सोनालीने गेल्या वर्षी स्वत:च्या हाताने गणपती बाप्पाची मुर्ती तयार केली होती. तिने त्या मुर्तीसोबत फोटो शेअर केले आहेत. तिने आजीसोबतचे फोटोही शे्अर केले आहेत.



























































