
भारतीय जनता पक्ष आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी भाजपच्या प्रदेश प्रभारींची घोषणा केली आहे.
भाजपकडून महाराष्ट्रातील भाजप नेते विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर नवीन जबाबदारी देण्यात आली आहे. विनोद तावडे यांची बिहारच्या प्रभारीपदी, तर पंकजा मुंडे यांची मध्य प्रदेशच्या सहप्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पंकजा मुंडे यांना पी. मुरलीधर राव यांच्या नेतृत्वाखाली काम करावे लागेल.
भारतीय जनता पक्षाने 15 राज्यांतील पक्ष प्रभारींची नावे आज संध्याकाळी जाहीर केली. त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री बिप्लब देब हरियाणाचे प्रभारी असतील. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे पंजाब-चंदीगडचे प्रभारी असतील. बिहारचे माजी मंत्री मंगल पांडे यांना पश्चिम बंगालचे प्रभारी करण्यात आले आहे. याशिवाय संबित पात्रा यांना पूर्वोत्तर राज्यांचे समन्वयक बनवण्यात आले आहे.
हरियाणाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळलेले विनोद तावडे यांच्याकडे आता भाजपच्या हातून निसटलेल्या बिहारची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना केरळची तर राष्ट्रीय महिला आघाडीच्या माजी अध्यक्षा विजया रहाटकर यांच्याकडे राजस्थानच्या प्रभारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
BJP appoints party’s state incharges & co-incharges for states
Ex-Tripura CM Biplab Deb to be the incharge of Haryana,ex-Gujarat CM Vijay Rupani to be that of Punjab-Chandigarh, ex-Bihar Minister Mangal Pandey to be that of WB & Sambit Patra to be coordinator of northeast states pic.twitter.com/z80tMyGYQw
— ANI (@ANI) September 9, 2022
कोणत्या राज्यात कोण प्रभारी आणि सहप्रभारी?
बिहार – विनोद तावडे (प्रभारी), हरीश द्विवेदी (सहप्रभारी)
छत्तीसगड – ओम माथूर (प्रभारी), नितीन नवीन (सहप्रभारी)
दमनस दीव आणि दादराव नगर हवेली – विनोद सोनकर (प्रभारी)
हरयाणा – बिप्लब कुमार देब (प्रभारी)
झारखंड – लक्ष्मीकांत बाजपेई (प्रभारी)
केरळ – प्रकाश जावडेकर (प्रभारी), डॉ. राधा मोहन अग्रवाल (सहप्रभारी)
लक्षद्वीप – डॉ. राधा मोहन अग्रवाल (प्रभारी),
मध्य प्रदेश – पी. मुरलीधर राव (प्रभारी), पंकजा मुंडे, राम शंकर कथेरिया (सहप्रभारी)
पंजाब – विजयभाई रूपाणी (प्रभारी), नरिंदर सिंह रैना (सहप्रभारी)
तेलंगणा – तरूण चुग (प्रभारी), अरविंद मेनन (सहप्रभारी)
चंडीगढ – विजयभाई रूपाणी (प्रभारी)
राजस्थान – अरुण सिंह (प्रभारी), विजया रहाटकर (सहप्रभारी)
त्रिपुरा – महेश शर्मा (प्रभारी)
पश्चिम बंगाल – मंगल पांडे (प्रभारी), अमित मालवीय, आशा लकरा (सहप्रभारी)
पूर्वोत्तर राज्य – संबित पात्रा (प्रभारी), रितुरात सिन्हा (सहप्रभारी)



























































