
शंकराचार्य स्वरुपानंद सरवस्वती (Shankaracharya Swaroopanand Saraswati) यांचे निधन झाले आहे. रविवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास मध्य प्रदेशमधील नरसिंहपूर येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मृत्युसमयी ते 99 वर्षांचे होते.
Dwarka Shankaracharya Swami Swaroopanand Saraswati passes away at the age of 99, in Madhya Pradesh’s Narsinghpur
(file pic) pic.twitter.com/Bzi541OiPW
— ANI (@ANI) September 11, 2022
स्वामी स्वरुपानंद सरस्वती महाराज यांचा जन्म 2 सप्टेंबर 1924 रोजी मध्य प्रदेशमधील सिवनी जिल्ह्यातील जबरपूरजवळील दिघोरी गावातील एका ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला होता. आई-वडिलांचे त्यांचे नाव पोथीराम उपाध्याय असे ठेवले होते. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांनी घर सोडले आणि धर्मयात्रा सुरू केली. या दरम्यान ते उत्तर प्रदेशमधील काशी येथे पोहोचले आणि ब्रह्मलीन श्री स्वामी करपात्री महाराज यांच्याकडून वेद-वेदांग आणि धर्मशास्त्राचे शिक्षण घेतले.
तुरुंगवासही भोगला
स्वातंत्र्यलढ्यामध्येही त्यांनी स्वत:ला झोकून दिले होते. 1942 मध्ये वयाच्या अवघ्या 19 व्या वर्षी ‘क्रांतिकारी साधू’ म्हणून त्यांची ओळख बनली. स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाल्याने त्यांना इतर क्रांतिकारांप्रमाणे काशी येथील तुरुंगात 9 महिने आणि मध्य प्रदेशमधील तुरुंगात 6 महिने शिक्षा भोगावी लागली होती.
1981 मध्ये मिळाली शंकराचार्य ही उपाधी
स्वरुपानंद सरस्वती यांनी 1950 मध्ये दंड दिक्षा घेतली. शंकराचार्य स्वामी ब्रह्मानंद सरस्वती यांच्याकडून त्यांनी दंड दिक्षा घेतली होती. त्यानंतर त्यांना स्वामी स्वरुपानंद सरस्वती या नावाने ओळखले जाऊ लागले. 1981 मध्ये त्यांना शंकराचार्य ही उपाधी मिळाली. 1982 मध्ये ते गुजरातच्या द्वारकाशारदा पीठ आणि बद्रिनाथच्या ज्योतिर मठाचे शंकराचार्य बनले.




























































