
नायर रुग्णालयात अॅक्युप्रेशर थेरपीचे शिक्षण घेणाऱया तरुणीने तिच्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. श्रेयसी पाटकर (28) असे तिचे नाव होते. आत्महत्येमागचे नेमके कारण समजू शकले नसून याप्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.
आग्रीपाडय़ातील चांदोरकर मार्गावर असलेल्या साई सोसायटीत श्रेयसी तिच्या आई-वडील आणि भावासोबत राहत होती. ती नायर रुग्णालयातील मेडिकल कॉलेजमध्ये अॅक्युप्रेशर थेरपीचे शिक्षण घेत होती. गुरुवारी दुपारी घरात कोणी नसताना श्रेयसीने गळफास घेऊन आत्महत्या केली. घरात कुठलीही सुसाईड नोट सापडली नाही. अभ्यासाचा ताण तसेच आजारपणाला वैतागून तिने असे टोकाचे पाऊल उचलले असावे असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.



























































