मुंबईकर तरुणाची सायकलवरून हिंदुस्थानाला प्रदक्षिणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत नाहूर येथे राहणाऱया 28 वर्षीय अजित दळवी यांनी आजपासून हिंदुस्थान प्रदक्षिणा सुरू केली आहे. देशाच्या रक्षणासाठी शहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दळवी यांनी या मोहिमेला सुरूवात केली आहे. अजित दळवी हे माझगाव शिप बिल्डर्स लिमिटेडमध्ये वेल्डर पदावर काम करतात. देशाला प्रदक्षिणा घालण्याची मोहीम ते 27 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश असा एकूण 15 हजार 2 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून साकारणार आहेत. आज सोमवारी घटस्थापनेचा मुहूर्त साधून दळवी यांनी माझगाव डॉक परिसरातून प्रवासाला सुरुवात केली. दळवी हे नाहूर पश्चिम येथील म्हाडा कॉलनीत राहतात. हिंदुस्थान प्रदक्षिणेचा शेवट ते गगनबावडा तालुक्यातील कोदे बुद्रुक या गावी करणार आहेत.