मुंबईत कोरोनाचे 115 रुग्ण 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत आज दिवसभरात कोरोनाचे 115 रुग्ण सापडले. सुदैवाने एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. 104 रुग्णांना कोणतीही लक्षणे नव्हती. 11 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर दोघा जणांना ऑक्सिजन बेड देण्यात आले. दिवसभरात 106 जण कोरोनामुक्त झाले, तर सक्रिय रुग्णांची संख्या कमी होऊन ती 697 वर पोहोचली आहे. दरम्यान, राज्यात दिवसभरात 459 कोरोना रुग्ण सापडले तर 5 जणांचा मृत्यू झाला. 538 जण कोरोनामुक्त झाले, तर सक्रिय रुग्णांची संख्या 3 हजार 192 वर पोहोचली आहे.