
परतीच्या पावसाने आज जिह्यात पुन्हा एकदा हजेरी लावली. दिवसभर ढगाळ वातावरणासह अधूनमधून कोसळणाऱया पावसाच्या जोरदार व हलक्या सरींनी शेतकऱयांनाही चिंतेत टाकले आहे.
कोल्हापुरात यंदाच्या पावसाळ्यात दोन वेळा पूरसदृश स्थिती निर्माण झाली. त्याचा शेतीलाही फटका बसला. त्याचबरोबर आता परतीच्या पावसानेही शेतकऱयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. नुकत्याच झालेल्या नवरात्रोत्सवात ढगांच्या गडगडात आणि विजांच्या कडकडाटात जोरदार पावसाने हजेरी लावली होती. आज सकाळपासून जिह्यात बहुतांश सर्वच ठिकाणी ढगाळ वातावरण राहिले. ठिकठिकाणी हलक्या सरी कोसळल्या. दुपारी जोरदार पावसाने झोडपून काढले.





























































