5G स्पीड टेस्ट करण पडलं महागात, काही सेकंदात संपला डेटा; वाचा काय आहे प्रकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तुम्ही देखील 5G​ ची वाट पाहत आहात का? अशा परिस्थितीत तुम्हाला काही गोष्टींची तयारी करावी लागेल. तुमचा डेटा 5G नेटवर्कवर जलद संपेल. जर तुम्ही दररोज 1GB किंवा 2GB डेटा असलेली स्कीम वापरत असाल तर तुमचा सर्व डेटा काही सेकंदात संपेल. अनेक युझर्स याबाबत तक्रार करत आहेत. काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया.

5G नेटवर्क लॉन्च झाले आहे आणि लोक फोनमध्ये 5G नेटवर्क येण्याची वाट पाहत आहेत. 5G नेटवर्क येताच तुम्ही पहिली गोष्ट काय कराल? बर्‍याच लोकांप्रमाणे, तुम्हाला कदाचित 4G आणि 5G स्पीडमधील फरक पाहायचा असेल. पण तुम्ही त्यासाठी तयार आहात का?

5G चाचणी किंवा इतर सेवा तुम्हाला महागात पडू शकतात. वास्तविक, अनेक युजर्स याबाबतची माहिती ट्विटरवर शेअर करत आहेत. येथे युझर्सनी फरक जाणून घेण्यासाठी 5G स्पीड टेस्ट केली.

यामध्ये त्यांचा निम्म्याहून अधिक डेटा नष्ट झाला. हा जोक नसून वास्तव आहे. 5G वर युझर्सचा मोबाईल डेटा झपाट्याने संपत आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया.

काही सेकंदात डेटा संपेल

तुम्हाला 5G वर 1Gbps पर्यंत स्पीड मिळायला हवा. पण सध्या देशात 5G चा स्पीड 500 ते 600Mbps इतकाच उपलब्ध आहे. 5G च्या हायस्पीडमुळे डेटा देखील जास्त वापरला जाईल असे नाही. परंतु इतर अनेक कारणांमुळे डेटा वेगाने संपू शकतो.