प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीची आत्महत्या, गळफास लावलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री वैशाली ठक्कर हिने आत्महत्या केल्याचं वृत्त आहे. इंदूर येथे आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तिच्यासोबत सुसाईड नोटही आढळली आहे.

गेल्या वर्षभरापासून वैशाली इंदूर येथे राहत होती. हिंदी मालिका जगतातली ती एक प्रसिद्ध अभिनेत्री होती. तिने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 2010मध्ये ये रिश्ता क्या केहलाता है या मालिकेपासून केली होती. या मालिकेत तिने संजना नावाची भूमिका केली होती. त्यानंतर ती ये है आशिकी या मालिकेतही झळकली होती. त्याखेरीज ससुराल सिमर का, सुपर सिस्टर, मनमोहिनी 2 अशा मालिकांमधूनही ती लोकप्रिय झाली होती. रक्षाबंधन ही तिची शेवटची मालिका होती.

गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात वैशालीचा साखरपुडा झाला होता. तिने आपल्या रोकाचे व्हिडीओ देखील शेअर केले होते. पण, एका महिन्यात तिने आपलं लग्न मोडल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे तिच्या आत्महत्येमागे काय कारण असावं, याचा पोलीस शोध घेत आहेत.