संगमेश्वरमधील तीन ग्रामपंचायतींवर भगवा फडकला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत संगमेश्वर तालुक्यात आंबेडबुदृक, कोंड असुर्डे आणि मौजे असुर्डे या तीन ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकला असल्याची माहिती सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक यांनी दिली.

निवडणूक जाहीर झाल्यापासून येथे विविध राजकीय पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. भारतीय जनता पक्षाने शिंदे गटातील काही कार्यकर्त्यांना सोबत घेऊन येथे व्यूहरचना आखली होती. त्यामुळे निवडणुकीत रंगत निर्माण झाली. अटीतटीच्या आणि प्रतिष्ठेच्या बनलेल्या या निवडणुकीत अखेर शिवसेना सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक यांनी चमत्कार घडवून दाखवत तीनही ग्रामपंचायतींवर भगवा फडकवून दाखवला आहे.

अखेरच्या काही दिवसात सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रचना महाडि , माजी सभापती सुजित महाडिक यांनी निवडणूकीत उडी घेत विरोधी पक्षांना कोणताही थांगपत्ता लागू न देता जबरदस्त धक्का दिला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे तीनही ठिकाणी सरपंच निवडणूक आले आहेत.

कोंड असुर्डे सरपंचपदी – सिध्दीका बोले
मौजे असुर्डे सरपंचपदी – प्रदीप शिंदे
आणि आंबेडाबुदृक सरपंचपदी – सुहास मायंगडे

दरम्यान, सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक यांनी तिघांचेही प्रत्यक्ष भेटून अभिनंदन केले आणि पाठीवर शाब्बासकीची थापही मारली आहे.