शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी अंधेरी पश्चिम विधानसभेतील युवासेना विभाग युवती अधिकारीपदी तेजस्वीनी सूर्यवंशी यांची नियुक्ती केली आहे. सदर नियुक्ती तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर पदाधिकाऱयाचे काम बघून कायम करण्यात येईल, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.































































