
महाराष्ट्र लोकसेवा आयोग, पेंद्रीय लोकसेवा आयोग आदींसोबत स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना तुम्ही विचार कशापद्धतीने करता हे महत्त्वाचे असते. त्यामुळे आपल्या विचारांची बैठक पक्की करण्यासाठी प्रयत्न करा. थोडक्यात सांगायचे झाले तर सूक्ष्म नियोजन हाच यूपीएससीतील यशाचा पासवर्ड आहे असे सांगत सिक्कीम राज्यातील आयएएस अधिकारी रोहन आगवणे यांनी आपल्या यशाचा प्रवास उलगडला.
पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांच्या अनाथाश्रम ममता बाल सदन पुंभारवळण येथे मुलींसाठी आयोजित ‘मी होणार आयएएस अधिकारी’ या विशेष स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. ममता बाल सदनमध्ये सध्या 54 मुली शिक्षण घेत आहेत. स्पर्धेच्या युगात माईंच्या संस्थेतील मुली कुठेही कमी पडू नये यासाठी माईंचे पहिले मानसपुत्र तथा संस्थेचे अध्यक्ष दीपकदादा गायकवाड यांच्या संकल्पनेतून दरमहा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात येतो. यावेळी आयएएस अधिकारी रोहन आगवणे म्हणाले, आजूबाजूच्या सगळ्या घटनांचा, स्थित्यंतरांचा आपल्या अभ्यासाशी संबंध जोडता आला पाहिजे. देशपातळीवरच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले पाहिजे. वर्तमानपत्रात येणाऱया बातम्यांमागील संदर्भ शोधून आपला अभ्यास, स्मरणशक्ती आणि माहितीचा साठा वाढवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.
कार्यक्रमाचे संचालन मुकेश चौधरी, प्रास्ताविक ममता बाल सदनच्या अधीक्षिका स्मिता पानसरे तर आभार सरोज जांगडा यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता संजय गायकवाड, पूजा गायकवाड, रवी ओहोळ, मंजू गायकवाड, प्रसन्ना गायकवाड, रितेश जांभुळकर, चांदणी शिरोडकर, अशोक पवार यांनी परिश्रम घेतले.































































