दिवाळीत भाविकांकडून साईचरणी अठरा कोटींचे दान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
नुकत्याच सरलेल्या दिवाळीत भाविकांनी साईबाबांना तब्बल अठरा कोटींची दान अर्पण केले आहे. साईदर्शनासाठी दरवर्षी अडीच कोटीहून अधिक भाविक साईदरबारी हजेरी लावतात. दिवाळी व सुट्टयांमध्ये विक्रमी गर्दी असते. यंदा दिवाळीत 20 ऑक्टोंबर ते 5 नोव्हेंबर या पंधरा दिवसांच्या काळात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. या पंधरा दिवसात भाविकांनी 17 कोटी 77 लाख 53 हजारांचे दान साईबाबांना अर्पण केल्याची माहिती संस्थानच्या सीईओ भाग्यश्री बानायत यांनी दिली.
चौकट
दानाचा तपशील-दक्षिणा पेटी 3 कोटी 11 लाख 79 हजार, देणगी काउंटर 7 कोटी 54 लाख 45 हजार, ऑनलाइन देणगी 1 कोटी 45 लाख 42 हजार, चेक, डीडी देणगी 3 कोटी 3 लाख 55 हजार, मनीआर्डर द्वारे 7 लाख 28 हजार, डेबिट क्रेडिट कार्ड देणगी 1 कोटी 84 लाख 22 हजार.
सोने- 860. 450 ग्रँम (39 लाख 53 हजाऱ), चांदी- 13345.970 ग्रँम ( 5 लाख 45 हजाऱ)  परकीय चलन- 29 देशांतील परकीय चलन- 24 लाख 80 हजार.